डोळ्यांच्या तक्रारींपासून ते पित्त शमविणाऱ्यापर्यंत तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीराच्या योग्य वाढीसाठी जशी पोळी,भाजी, भात या पदार्थांची आवश्यकता आहे. तशीच दूध आणि दुग्दजन्य पदार्थांचीही तितकीच गरज असते. त्यामुळे दही, ताक, लोणी आणि तूप यांचा आहारात समावेश करावा. पूर्वीच्या काळी तूप खाऊन रुप येतं असं म्हटलं जायचं मात्र ते काही चूक नाही. तूपाचं सेवन केल्यामुळे त्वचा तजेलदार होते. तसंच तूप खाण्याचे अन्यही बरेच फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊ तूप खाण्याचे फायदे.

१. तूपाचं सेवन केल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.

२. वात असल्यास तुपाच्या सेवनाने तो कमी होतो.

३. डोळ्यावरील ताण कमी होतो.

४. पचनक्रिया सुधारते.

५. अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

६. त्वचेचा पोत सुधारतो आणि रंग उजळ होतो.

७. अनेकांना पुरणाचं जेवण जेवल्यानंतर खशाखाली जळजळ होते किंवा अन्न बाहेर येतं अशा वेळी पुरणाच्या जेवणात म्हणजे पुरणपोळी, कटाची आमटी यांच्यासोबत तुपाचं सेवन करावं.

८. तुपामुळे वजन वाढत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post