चिकू खाण्याचे ८ फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सर्वात गोड फळ कोणतं असा प्रश्न विचारला तर सहाजिकच चिकू आणि सिताफळ ही दोन नावं समोर येतील. त्यातील चिकूमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हे फळ अनेकांना आवडतं. भारतात गुजरात, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रात पुणे, कोकण, खानदेश, सुरत, ठाणे या ठिकाणी चिकूची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्यामुळे बाजारात कोणत्याही ऋतूमध्ये चिकू सहज मिळतो. चवीला जसा हा चिकू गोड असतो तसेच त्याचे काही फायदेदेखील आहेत. त्यामुळे चिकू खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.

१. चिकूमध्ये फलशर्करा असतो. त्यामुळे थकवा जाणवल्यास चिकू खावा.

२. अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.

३.रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खावा.

४. चिकू खाल्ल्याने आतडय़ांची कार्यक्षमता वाढून व ती सुदृढ बनतात.

५. वारंवार चक्कर येणं, शरीरातील साखर कमी होणं अशा तक्रारी असतील तर चिकू खावा.

६. तापामुळे तोंडाची चव गेल्यास चिकू खावा.

७. चिकूचं सेवन केल्यामुळे शौचास साफ होते.

८. जुलाब, ताप असल्यास चिकू खावा.

सावधानता :
१. मधूमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चिकू खावा.

२. कच्चा चिकू कधीच खाऊ नये.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post