पीच फळ खाणे फायद्याचे; अनेक आजार होतील दूर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हे फळ त्याच्या विशिष्ट रंगासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरून फिकट नारिंगी व थोडी पिवळ्या रंगाची छटा असणारे हे फळ आतून मात्र अतिशय रसाळ व मधुर आहे. हे फळ मुळचे चीनमधले असून भारतात एप्रिल ते जूनपर्यंत बाजारात दिसते.

पीच ह्या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेहीसाठी हे योग्य फळ आहे. थोडय़ा प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्याने अ‍ॅण्टिऑक्सिडंटचे काम करते. जीवनसत्त्व ‘अ’, ‘ई’ व ‘के’चे प्रमाण भरपूर असल्याने डोळ्यांचे आजार- रातांधळेपणा, मोतीबिंदू, नजर कमी होणे या सर्व तक्रारी कमी करण्यास मदत करते. पीचमध्ये फ्लुराइड हा घटक असल्याने दातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास तसेच हाडांची मजबुती कायम ठेवण्यास भर टाकते.

सायनासिटीसशी संबंधित आजारावरही हे फळ चांगला उपाय आहे. हे फळ दररोज खाल्ल्यास त्वचेवर येणाऱ्या बारीक रेषा तसेच पुटकुळ्या येण्याचे प्रमाण कमी होते म्हणूनच याचा वापर भरपूर प्रकारच्या सौंदर्यसाधने बनवण्यास करतात. या फळाचा नसíगक गर चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर लावल्यास त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाबाची तक्रार असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमणात पोटॅशिअम व कमी सोडीअम असलेले अन्न खाणे चांगले. पीचमध्ये भरपूर पोटॅशिअम व सोडिअम नगण्य असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हे खाल्ले पाहिजे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post