फुकट प्रसिद्धीसाठी स्टंट; यावरच यांची दुकानदारी : अमित गटणे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीत वाजनाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणात प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत आजारी व वृद्ध नागरिकांना याचा त्रास तर होतोच, शिवाय धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुप्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोरोना रुग्ण व सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी फटाके न वाजवण्याचे आवाहन केले आहे. परंतु मनसेचे परेश पुरोहित यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर केलेली टीका ही हास्यास्पद आहे, असा टोला भाजपा प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे यांनी लगावला आहे.

बहुतेक वाचण्यामध्ये पुरोहितांकडून चूक झालेली असावी. आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा फतवा काढला जात नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये फक्त आवाहनच करता येते, याची बहुधा पुरोहितांना माहिती नसावी.

महापौर वाकळे यांच्याबरोबरच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी सुद्धा कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी फटाके फोडू नये, असे आवाहन केले आहे. परंतु पुरोहितांनी टीका मात्र फक्त महापौरांवरच केलेली आहे. यातूनच प्रसिद्धीसाठी असलेली त्यांची केविलवाणी धडपड दिसून येत आहे.

सन्माननीय पुरोहित यांनी गेल्या दहा वर्षात जनतेसाठी किंवा लोककल्याणासाठी केलेल्या कामांची यादी जनतेसमोर मांडावी, लोकांना कळेल की हे नक्की प्रसिद्धी झोतात येण्यासाठी असे विविध विधाने करतात, का खरंच त्यांना जनतेच्या कामाप्रती कळवळा आहे. सर्व काही व्यवस्थित चाललेले असताना प्रक्षोभक विधाने करायची, मीडियाचा फोकस आपल्याकडे वाढवायचा आणि आपली दुकानदारी जोरात चालू ठेवायची, हाच यांचा धंदा आहे, 
अशी टीका गटणे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post