मनसेच्या पुरोहितांची महापौरांवर टीका म्हणजे वाचता येईना अंगण वाकडे : पुष्कर कुलकर्णी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीत वाजनाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणात प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत आजारी व वृद्ध नागरिकांना याचा त्रास तर होतोच, शिवाय धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुप्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोरोना रुग्ण व सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी फटाके न वाजवण्याचे आवाहन केले आहे. परंतु मनसेचे परेश पुरोहित यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर केलेली टीका ही हास्यास्पद आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा फतवा काढलेला नसून आवाहन केलेले आहे, याचा अर्थ कदाचित पुरोहित यांना समजला नाही. त्यामुळे त्यांची अवस्था वाचता येईना अंगण वाकडे असे झालेली दिसते, अशी टीका भाजपाचे सावेडी शक्ती केंद्र प्रमुख पुष्कर कुलकर्णी यांनी केली आहे.

बहुतेक वाचण्यामध्ये पुरोहितांकडून चूक झालेली असावी. आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा फतवा काढला जात नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये फक्त आवाहनच करता येते, याची बहुधा पुरोहितांना माहिती नसावी.

महापौर वाकळे यांच्याबरोबरच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी सुद्धा कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी फटाके फोडू नये असे आवाहन केले आहे. परंतु पुरोहितांनी टीका मात्र फक्त महापौरांवरच केलेली आहे. यातूनच प्रसिद्धीसाठी असलेली आपली केविलवाणी धडपड दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post