दररोज सकाळी उठताना डोकं दुखतंय? 'ही' असतील कारणेएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दररोज सकाळी झोपेतून उठताना अनेकांना डोके दुखीचा त्रास होतों असे का होते, याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
  • पूर्ण झोप न होणे हे डोकेदुखी चे प्रमुख कारण असते.
  • आपण दिवभरात जी मेहनत घेतो किंवा धावपळ करतो, त्या अनुषंगाने साधारण 8 तास झोप शरीराला आवश्यक असते.
  • पण बऱ्याच वेळेस अतिजागरण केल्यामुळे ही झोप अपूर्ण राहते किंवा तिचा कालावधी कमी होतो. खूप लोकाना सकाळी लवकर उठून कामाला पळावे लागते.
  • काही लोकांची सकाळी उठण्याची डेडलाईन वेळ ठरलेली असते. म्हणजे सकाळी 6, 7, 8 वाजता. पण जर समजा तुम्ही रात्री 1 ला झोपलात आणि तुमच्या डेडलाईनला सकाळी 6 ला उठलात म्हणजे तुम्ही फक्त 5 तासच झोपलात. यामुळे झोप अपूर्ण राहते व ह्याचा डायरेक्ट परिणाम शरीरावर, परिणामी मेंदूच्या क्रियेवर होतो.
  • त्यामुळे डोक दुखल्यासारखे वाटते. आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणामध्ये हा त्रास वाढीस लागला आहे.
  • रात्री सर्व लाइटस बंद करुन मोबाइल वापरला जातो. मोबाईलच्या स्क्रीनचा प्रखर प्रकाश डोळ्याला त्रासदायक ठरतो.
  • डोळ्यावर खुप ताण येतो. यामुळे डोळ्यांना पण थकवा येतो,.डोळे लालसर पडतात व सकाळी उठल्यावर डोळे पण दुखतात.
  • खुप पेशंटला हे ओळखणे अवघड जाते की नेमकी डोक दुखतय की डोळे? यासाठी मोबाईलचा रात्रीस वापर कमी करुन निदान 8 तास व कमीत कमी 7 झोप कशी घेता येईल हे बघावे. मोबाईल किंवा लैपटॉप रात्री वापरणे अपरिहार्य असल्यास झोपताना बाजारात मिळणारे नेत्रांजन, तुपांजन, डोळ्यात टाकून झोपावे. यामुळे सकाळी उठताना डोळ्याना त्रास कमी होईल.
  • रात्री झोपताना डोक्यास मालिश केल्याने सुद्धा अपेक्षित परिणाम साधता येतो.
  • सकाळी उठल्यावर थंड पाण्याचा फवारा चेहरा व डोळ्यावर मारल्यास सुद्धा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. हे उपाय करुन देखील फरक न पडल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.
(कोरा या संकेतस्थळावर मयुर सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post