'बजेट'साठी तुम्हीही देऊ शकता केंद्र सरकारला सूचना


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वार्षिक अर्थसंकल्प 2021-22 साठी नागरिकांकडून कल्पना-सूचना-प्रस्ताव मागविले आहेत. वार्षिक अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये समाविष्ट करण्यासाठी नवनवीन कल्पना शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून अर्थ मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी देशातील प्रमुख उद्योग, वाणिज्य संघटना, व्यापार संस्था आणि तज्ज्ञ यांच्यासमवेत पूर्व अर्थसंकल्पीय सल्लामसलत केली जाते. देशातील सध्याची कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेता, मंत्रालयाला अर्थसंकल्प पूर्व सल्लामसलत वेगळ्या स्वरूपात घेण्याची विनंती विविध घटकांनी केली होती. त्यानुसार विविध संस्था व तज्ज्ञांकडून सूचना आणि प्रस्ताव येण्यासाठी एक समर्पित ई-मेल तयार करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे.

2021- 22 ची वार्षिक अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत अधिक सहभागात्मक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून देशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने माय गव्ह ( MyGov) प्लॅटफॉर्मवर एक मायक्रो-साइट (ऑनलाइन पोर्टल) तयार केले आहे, जे 15 नोव्हेंबर 2020 पासून अर्थसंकल्पासाठी येणाऱ्या सूचना स्वीकारणार आहे. या पोर्टलवर 2021-22 च्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांना वैयक्तिक पातळीवर त्यांच्या सूचना, कल्पना नोंदविता येतील. नागरिकांच्या सूचनांवर पुढे सरकारच्या संबंधित मंत्रालय व विभागाकडून अभ्यास केला जाईल. आवश्यकता भासल्यास संबंधित नागरिकांना त्यांच्या ई-मेल वा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला जाईल. नागरिकांना या पोर्टलवर 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत कल्पना, सूचना व प्रस्ताव पाठवता येतील.

1 Comments

  1. बेरोजगारी/नोकरभरती वर लक्ष देणे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post