दुधी भोपळ्याचा आहारात करा समावेश; ‘या’ ८ तक्रारी होतील दूर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेकांच्या नावडतीच्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे दुधी भोपळा. हिरवट- पांढरा असलेला दुधी भोपळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र,तो खाण्यासाठी अनेक जण नकार देतात. अशा वेळी गृहिणी पराठे किंवा थालीपीठ हलवा यांच्या माध्यमातून तो मुलांना खाऊ घालतात. दुधी भोपळा हा अत्यंत गुणकारी असून त्याच्या सेवनामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे भोपळा खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पोटाच्या तक्रारी दूर होतात. मलावष्टांभाचा त्रास कमी होतो.

२. उष्णातेचा त्रास होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसात खडीसाखर घालून तो रस प्यावा.

३. वजन कमी होते.

४.अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.

५. शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे.

६. डोळ्यांना थंडावा मिळतो.

७. खूप ताप आला असेल तर दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते.

८. अशक्तपणा दूर होतो.

Post a Comment

Previous Post Next Post