एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
नगर तालुक्यातील ससेवाडी येथील लष्करी जवानाला पंजाबमधील स्टेट ऑपरेशन सेलने अटक केली आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा (बीएसएफ) प्रकाश काळे असे या जवानाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित बीएसएफचा जवान काळे हा फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये तो अडकला होता. काळे याने बीएसएफ जवानांचा व्हॉटसअॅप ग्रुप बनवला होता व तोच त्याचा अॅडमिनही होता. या ग्रुपमध्ये ती महिलाही होती. या ग्रुपमध्ये बीएसएफ जवानांच्या गस्तीची माहिती दिली जात होती व ती त्या महिलेला आपोआप मिळत होती. त्यासाठी ती महिला भारतीय सीमकार्डचा वापर करीत होती. ही माहिती ती महिला पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता लष्कराने जवान काळेला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे.
पंजाब स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने काळेला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पंजाबातील घरींडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला कोठडी दिली आहे.
Post a Comment