सिमला मिरची खाण्याचे गुणकारी फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस आणि पौष्टिक आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याच वेळा आपण पालेभाज्या किंवा भोपळी मिरची, कारले अशा भाज्या खाणं टाळतो. परंतु, नावडतीच्या असणाऱ्या याच भाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. यातच भोपळी मिरची खाण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. भोपळी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच आज भोपळी मिरची खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. तसंच भोपळी मिरचीला अनेक जणसिमला मिरची किंवा ढोबळी मिरची असंदेखील म्हणतात.

१. वजन नियंत्रणात राहते
वजन कमी करायचं असल्यास भोपळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. या भाजीमध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे भोपळी मिरचीची भाजी खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. तसंच ती शरीरातील मेददेखील कमी करण्यास मदत करते.

२. मधुमेह नियंत्रणात राहतो
वजनाप्रमाणेच भोपळी मिरचीमध्ये शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसंच तिच्यात व्हिटामिन्स आणि अॅटीऑक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं.

३. अपचनक्रिया सुधारते

अनेक जणांना अपचन झाल्यावर त्रास होतो. मात्र भोपळी मिरची खाल्लास पचनक्रिया सुरळीत राहते. तसंच पोटाचे विकारदेखील बरे होतात.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचं आहे. या भाजीतून शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे वारंवार होणारे लहान-मोठे आजार दूर राहतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post