महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान आपण उधळलं; पहा आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र निर्माण केलं. मात्र त्यांचं हे कारस्थान आपण उधळून लावलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे :

 • मास्क घाला, नियम पाळा आणि सण साजरे करा
 • आता आपल्याला कोरोनाला पूर्ण हद्दपार करायचं आहे.
 • माझी विनंती तुम्ही नेहमी मानली आहे. हे आजचे आकडे तेच सांगत आहेत.
 • प्रदूषण टाळून दिवाळी साजरी करा
 • येत्या दिवाळीत फक्त सुख येऊ द्या, कोरोनाला दाराबाहेर राहू द्या
 • सगळ्यांचा सामना करत आपण पुढे जात आहोत
 • हे सरकार तुमचं आहे
 • सगळ्या घटकांसाठी विचार सुरू आहे
 • ही योजना शिवसेनाप्रमुखांच्या नावाने अमलात आणत आहोत
 • राज्यातील माजी सैनिक तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुबियांसाठी घरपट्टी आणि निवासी मालमत्तेचा कर माफ करण्याची योजना
 • आपण संकटांचा सामना करून पुरून उरत आहोत
 • पीक खरेदीची केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
 • महाराष्ट्राची जनता अत्यंत समजूतदार आहे. ती सरकारसोबत उभी आहे
 • आजवर कधीच झाली नसेल इतकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
 • दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • जून ते ऑकटोबर दरम्यान महाराष्ट्रात 41 लाख हेक्टर जमीन पुर आणि वादळाच्या तडाख्यात
 • शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.
 • सोन्यासारख पीक उद्ध्वस्त झालं
 • त्यामुळे राज्यात गेले चार महिने आपण कठीण परिस्थिती मध्ये आहोत.
 • राज्यात अतिवृष्टी, वादळ यांनी थैमान घातलं
 • पावसाळ्याची सुरुवात निसर्ग चक्रीवादळाने झाली
 • या कार्यक्रमात जर्मन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं आहे
 • मेट्रोच्या कामासाठी के एफ डब्लु या जर्मन कंपनीकडून माफक व्याज दरात 545 दशलक्ष युरो इतकं कर्ज घेतलं आहे.
 • पीयूष गोयल उत्तम सहकार्य करत आहेत
 • सर्व सामान्य लोकांसाठी लवकरच लोकल रेल्वे सुरू होईल. त्यासाठी बोलणं सुरु आहे.
 • आता जवळपास सर्व काही सुरू करण्यात आलं आहे.
 • टीकेची पर्वा न करता काम करत राहणार आहोत
 • मेट्रोची जमीन मिठागराची आहे हे म्हणणारे मुंबईच्या प्रकल्पात मिठाचा खडा टाकत आहेत
 • या करारामुळे रोजगार निर्मिती होईल, अर्थ चक्र सुरू होईल.
 • अनेक सामंजस्य करणार या दरम्यान झालेले आहेत
 • मधल्या काळात महाराष्ट्र द्वेष करणाऱ्यांनी केलेली कारस्थानं मोडून काढली आहेत
 • टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. मी तुमच्या भल्यासाठी टीका सहन करेन.
 • कोणत्याही प्रार्थना स्थळावर आरती, नमाज, प्रेयर या सगळ्यांना गर्दी होते, त्यामुळे विशेष खबरदारी घेऊन ते सुरू करू
 • पण मंदिरात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जपणं आपलं काम आहे.
 • मंदिरेही लवकरच उघडणार
 • त्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल
 • दिवाळीनंतर नववी ते बारावी शाळा उघडण्यात येणार आहेत
 • हीच त्रिसूत्री राहणार आहे
 • मास्क घाला, अंतर पाळा, हात धुवत रहा
 • हे चालणार नाही
 • एक माणूस चारशे जणांना संक्रमित करू शकतो
 • मास्क न घालणारी मंडळी आता अनेक दिसत आहे
 • या मंडळींनी आपला आरोग्य नकाशा सुधारला आहे.
 • या मोहिमेत जीवाची पर्वा न करता सहभागी झालेल्यांना माझे धन्यवाद
 • हेच या मोहिमेचे यश आहे.
 • विशेष म्हणजे अनेक सहव्याधि असलेले आता पूर्ण बरे झालेत
 • कोरोना सह अनेक आजारांची माहिती त्यामुळे कळू शकली
 • माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात आली
 • त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यायची आहे
 • सध्या आपल्याकडे आरोग्य सुविधा खूप आहेत पण आरोग्य सेवक कमी आहेत.
 • आपल्यासाठी पुढील काही महिने आरोग्य सुविधा तशाच राहतील.
 • स्पॅनिश फ्लूने तेव्हा हाहाःकार माजला होता, आताही आलेला हा विषाणू तितकच नुकसान करू शकतो
 • पुन्हा नविन लॉक डाऊन करणं खूप जिकिरीचं ठरणार आहे
 • एखादा सैनिक अनेक आयुधांसह आपल्यासाठी लढतो, मग आपण मास्क घालू शकत नाही का
 • गेले काही महिने कोरोना योद्धे आपल्यासाठी झुंजत आहेत.
 • आपल्याला हे आपल्याकडे होऊ द्यायचं नाही
 • थंडीच्या मोसमात विषाणू जास्त वाढत आहे
 • अनेक देशात पुन्हा लॉक डाऊन करण्यात आलं आहे
 • पाश्चिमात्य देशात पुन्हा कोरोनाची लाट पुन्हा आली आहे
 • दिवाळी आणि दिवाळी नंतरचे पंधरा दिवस कसोटीचे
 • आपण हा सण दिवे, फराळ यांच्यासोबत साजरा करू
 • सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्या ला मनाई आहे
 • आत्ता पर्यंत आपण जे यश मिळवलं आहे ते फटाक्याच्या धुरात वाहून जाऊ शकत
 • बंदी घालण्यापेक्षा आवाहन करणं मला योग्य वाटतं
 • अजूनही कोरोनावर औषध नाही, लस नाही
 • प्रदूषणामुळे कोरोनाचा त्रास अधिक होऊ शकतो
 • सहव्याधी असलेल्यांना कोरोना हा घातक ठरतोय
 • दिल्लीत परिस्थिती थोडी गंभीर आहे
 • गलेया काही काळात आपण जिद्दीने आणि शिस्तीने कोरोनाला कमी केलं आहे
 • आता गर्दी वाढते आहे. त्यामुळे मी विनंती करत आहे.
 • आपण सगळे सण संयमाने साजरे केले
 • दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे
 • सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post