पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदे.

१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.

२. पोटांच्या तक्रारी दूर होतात.

३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

५. ताप आल्यास गुणकारी

६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.

७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.

८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते.

दरम्यान, अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत अशा विविध रेपिसी ट्राय करता येऊ शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post