दिवाळीत गोडधोड खाऊन तब्येत बिघडलीय? शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

नेहमी आहारात लिंबाचा समावेश कराल तर तुमचे रक्त शुद्ध होईल. यासाठी गरम पाण्यामधून लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घेतल्यास उत्तम
 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळीच्या दिवसांत खुप गोडधोड खाल्लयं… व्यायाम, डाएटचे तीनतेरा वाजलेत… तर आता गरज आहे तुमच्या शरीराला आराम देण्याची.. यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी या काही महत्त्वपूर्ण टिप्स..

सकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात गरम लिंबू पाण्याने करा. काही दिवस तरी नित्यनेमाने हा प्रयोग करून पहा. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी हे महत्वाचे आहे.

प्रोटीनची मात्रा या दिवसांत वाढवणे गरजेचे आहे. वजन घटवण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश असणे फार महत्त्वाचे असून सध्याच्या मोसमात आपल्या आहारात अंडी, चिकन, डाळी घ्या. यामुळे भुख मंदावेल आणि वजन कमी होण्याास मदत होईल.

फायबरयुक्त आहारही शरीराला उर्जा मिळवून देतो. यासाठी पालेभाज्या, सलाड, मोड आलेले कडधान्य घेतल्याने थकवा जाणवणार नाही. यामध्ये फलाहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

हेल्दी खाणं आणि खाण्याच्या वेळा पाळणं महत्त्वाचं आहे. त्याचे एक टाईमटेबल बनवा. ठारावित वेळेत ठराविक पदार्थ खाल्ले जातील याची काळजी घ्या. यामुळे डाएट प्लानमुळे होणारी अ‍ॅसिडीटीची समस्या टाळता येईल.

तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थांकडे सध्या दुर्लक्ष करा. दिवाळीच्या दिवसात खूप खाणं झाल्यामुळे आता हलका आहार घेणं आवश्यक आहे.

याबरोबरच पूर्णवेळ झोप, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या. यासाठी हळदीचे दुध, दालचिनी पावडर, आलेपावडर, ग्रीन टी किंवा घरगुती काढाही उपयुक्त ठरू शकतो.


(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post