दिवाळी स्नानासाठी घरीच असे तयार करा ‘उटणे’


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नानासाठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळीमध्ये सुगंधी उटण्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. आज आम्ही तुम्हाला उटण्याचे फायदे आणि घरीच उटणे कसे बनवावे याबाबत माहिती सांगणार आहोत.

उटणे कसे लावावे
सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे.

उटणे लावण्याचे फायदे
उटण्याने आपली त्वचा फार छान होते. तसेच दुध व गुलाबजल घातल्याने त्वचा मुलायम रहाते. आपला चेहरा स्वच्छ होतो. अंगाला चांगला सुंगध येतो. याने शरीराची मृत त्वचा ताजी होते.

घरीच सुगंधी उटणे कसे बनवावे?

साहित्य :

पाव किलो – मसूर डाळ पीठ

25 ग्रॅम – आवळकाठी

25 ग्रॅम – सरीवा

25 ग्रॅम – वाळा

25 ग्रॅम – नागर मोथा

25 ग्रॅम – जेष्टमध

25 ग्रॅम – सुगंधी कचोरा

5 ग्रॅम – आंबेहळद

25 ग्रॅम – तुलसी पावडर

25 ग्रॅम – मंजीस्ट

5 ग्रॅम – कापूर

वरील सर्व साहित्य एकत्र करून एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.

रोजच्या वापरासाठी उटणे :

मसूर डाळ आर्धा किलो

आंबे हळद पावकिलो

गुलाब पावडर 50 ग्रॅम

संत्र्याची साल 50 ग्रॅम

चंदन पावडर 50 ग्रॅम

कडूलिंबाच्या पानाची पावडर

वाळा 50 ग्रॅम

मुलतानी माती 50 ग्रॅम

पपई पावडर 50 ग्रॅम

हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी.

(कोरा या संकेतस्थळावर निकिता यांनी ही माहिती दिली.)

Post a Comment

Previous Post Next Post