अनारसे बिघडतात? मग ‘ही’ सोपी पद्धत ट्राय करा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. आता खरं तर चकली, चिवडा, लाडू हे पदार्थ साधारणपणे सगळ्यांच्याच घरात होतात. मात्र, या फराळाच्या ताटाची शोभा वाढते ती अनारश्यांमुळे. चवीला अत्यंत उत्कृष्ट पण करायला तितकाच अवघड हा पदार्थ. त्यामुळे अनारसे करताना कधी घाई करु नये असं म्हटलं जातं. म्हणून अनारसे नेमके कसे करायचे ते जाणून घेऊयात.

साहित्य :
तांदूळ
गूळ
खसखस
तूप

कृती :
अनारसे करण्याकरिता तीन दिवस अगोदर तांदूळ भिजत घालावे व त्याची पिठी करावी. त्यानंतर त्यात वजनाने बरोबरीने गूळ व गरजेपुरते तूप मिसळून एकत्र कुटावे. त्याचा कणकेसारखा घट्ट गोळा करावा. हा गोळा जमल्यास आठ-दहा दिवस मुरला तरी चालतो. अनारसे करताना भिजलेल्या पिठाच्या गोळ्या करून खसखसीच्या साहाय्याने थापाव्यात. तळताना तूप प्रथम तापवून घ्यावे. चुकूनही गार तूप नको. अनारसे गुलाबी रंगाचे झाले पाहिजेत.Post a Comment

Previous Post Next Post