स्वयंपाक घरातील काही वस्तूंच्या मदतीनं करा पर्ल फेशियल

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि नितळ असावी असे सगळ्यांना वाटणे अगदीच साहजिक आहे. मुली किंवा मुले दोघांसाठीही चेहऱ्याची त्वचा तितकीच महत्त्वाची असते. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील इतर बदल यांमुळे त्वचा खराब होते. यामध्ये त्वचेवर फोड येणे, खड्डे पडणे, त्वचा काळवंडणे, ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस येणे अशा तक्रारी उद्भवतात. मग बाजारात मिळणारी विविध महागडी सौंदर्यप्रसाधने वापरणे किंवा पार्लरमध्ये जाणे यांसारखे पर्याय स्विकारले जातात. तुम्ही अनेकदा महागड्या पार्लर किंवा सलूनमध्ये जाऊन फेशियल किंवा त्वचेसाठी पैसा खर्च केला असेल. पण लॉकडाउनमुळे अनेकांना स्वयंपाकघरातील वस्तूंमुळेही त्वचा सुंदर आणि नितळ होत असल्याचं समजलं. इतकेच नाही तर घरातील या वस्तूंमुळे उच्च दर्जाचं फेशियलही करता येतं हेही समजलं असेल. स्वयंपाक घरातील काही वस्तूंच्या मदतीनं तुम्ही पर्ल फेशियल करून पाहा.. पर्ल फेशियलमुळे तुमचा चेहरा आणखीनच उजळेल…पाहूयात पर्ल फेशिअल कसं करायचं..

साहित्य :
तीन चमचे – पर्ल पावडर (ऑनलाइन ऑर्डर करू शकता)
दोन चमचे – काकडीचा रस
दोन चमचे – पर्ल क्रीम (ऑनलाइन ऑर्डर करू शकता)
एक चमचा – मध
दोन चमचे – दूध
दोन चमचे – गुलाब पाणी
एक चमचा– लिंबाचा रस
एक अंडे

पद्धत

  • पाच ते दहा मिनिटं दुध आणि पाण्यानं चेहरा साफ स्वच्छ करा.
  • गुलाब पाणी आणि पर्ल पावडर एकत्र करून स्क्रब तयार करा. हा स्क्रब पाच मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर घासा.
  • चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ करा
  • १५ मिनिटापर्यंत पर्ल क्रीम चेहऱ्यावर लावा.. त्यानंतर स्वच्छ करा…
  • अंडे, मध आणि लिंबाचा रस एकत्र करा आणि त्यात पर्ल पावडर मिसळा. आता तयार झालेलं मिश्रण सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयोगी असेल. हा मास्क चेहऱ्यावर कमीतकमी १५ मिनिटांपर्यंत ठेवावा. विषेश करून चेहऱ्यावर आलेले फोड आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यावर हा स्क्रब जास्त परिणामकारक आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post