उभे राहून पाणी का पिऊ नये?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सध्याच्या धावत्या युगात सर्वांनाच घाई असते. निवांतपणा कोणाकडेच नसतो. अगदी पाणी प्यायलाही उसंत नसण्याचा हा काळ आहे. त्यामुळे बहुतांश लोक पाणी उभ्यानेच पितात. कारण सवयीचा परिणाम. आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी प्यायल्यास अनेक आजार आपल्याला जखडतात. उभ्याने पाणी पिण्याची ही सवय आपल्याला कशी घातक ठरू शकते, ते जाणून घेऊया..

मूत्रपिंडांचे आजार
मूत्रपिंडातून पाणी गाळले जाते. मात्र, उभे राहून पाणी प्यायल्यास मूत्रपिंड त्याचे हे काम नीट करू शकत नाही. शरीरातील पाणी न गाळताच वाहून जाते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मुत्राशय या दोन्हीमध्ये विषद्रव्ये तशीच राहतात. याचा परिणाम म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग होणे. तसेच मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

सांधेदुखी
‘उभे राहून पाणी पिणार त्याला सांधेदुखी होणार’ असे जुने लोक म्हणायचे. ते खरेच आहे. भविष्यात होणाऱ्या सांधेदुखीचे कारण उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीत दडलेले असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यातील वंगणाचे संतुलन बिघडून जाते आणि सांध्यातील हे वंगण तिथेच सांध्यात साठून राहते.

उभे राहून पाणी प्यायल्याने वात प्रकृती वाढते आणि गुडघे दुखणे सुरू होते. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास असेल त्यांनी बसूनच पाणी प्यावे. थोड्या दिवसात लगेच फरक पडेल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post