ड्रग्ज प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालसह गर्लफ्रेंडचीही होणार चौकशी

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तापास सुरु असताना ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) तापस सुरु केला होता. त्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली. नुकतात एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात धाड टाकली होती. आता चौकशीसाठी अर्जुनसह गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला समन्स बजावलं आहे.


एएनआयने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला एनसीबीने समन्स बजावलं आहे. ११ नोव्हेंबर रोजी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज सकाळी अर्जुन रामपालच्या घराच्या परिसरात एनसीबीने धाड टाकली होती. त्यालासुद्धा ११ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतलं. ड्रग्जप्रकरणी त्याचं नाव समोर आल्याने अ‍अँगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post