जास्त वेळ इयरफोनवर गाणी ऐकताय? तुमच्यासाठी आहे एक बॅड न्यूज

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेस, तसेच गाणी ऐकण्यासाठी गेल्या काही दिवसांत मोबाईल आणि इतर साधनांचा वापर वाढलाय. याबरोबरच सतत वापरल्या जाणार्‍या ईयरफोनमुळे कानाला इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात कानाच्या कुरबुरी वाढल्या असुन युवकांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने घरात बसून काम सुरू आहे. शाळाही ऑनलाईन झाल्याने मुलांना सतत ईअरफोन लावून कम्प्युटरसमोर बसावे लागत आहे. याचा मोठा फटका सध्या कानाला बसत असून ईयरफोनच्या सततच्या वापरामुळे कानात संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात कानाच्या इन्फेक्शनचे पेशंट्स वाढणे साहजिक आहे, मात्र गेल्या महिन्याभरात कानाच्या कुरबूरीत लक्षणीय वाढ झाली असून ही सतत मोबाईल ईअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे होत आहे.

समुद्र जवळ असलेल्या शहरात इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. वातावरणामुळेही फंगल होत असते. त्यात सतत ईयरफोन, ब्लुटूथ, इअर बर्डसच्या वापरामुळे तसेच ते नीट सॅनिटराईज न केल्यामुळेही कानात खाज येणे, पाणी येणे असे प्रकार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दहा दिवसांचा अ‍ॅण्टीबायोटीक कोर्स पूर्ण केल्यानंतर कानाचे इन्फेक्शन रोखण्यासाठी कमीत कमी ४० दिवसांची ट्रीटमेंट घ्यावी लागते, या दरम्यान कान स्वच्छ करण्यासाठी इअर बर्ड्सचा वापर टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

रात्रीच्या वेळी ईयरफोन वापरू नका
ईयरफोन वापरताना आवाज कमी ठेवावा. सतत दोन तासांपेक्षा अधिक काळ ईयरफोन लावू नये. खूप अधिक काळ लावायचे असतील तर मधून मधून त्यांना आराम मिळेल असे पाहावे. विमान प्रवास करताना ब्लूटूथ ईयरफोनचा वापर करण्यापूर्वी परवानगी जरूर घ्यावी. असे ईयरफोन निवडायचे जे कानाच्या खूप आत जाणार नाहीत. बाहेरच्या बाजूला राहतील. रात्रीच्या वेळी इयरफोन लावून झोपू नये. त्यामुळे कानाचे नुकसान होऊ शकते.

तर बहिरेपणा येऊ शकतो
जास्त प्रमाणात इअरफोन्सचा वापर केल्यास कानदुखी होऊ शकते. एखादा विशिष्ट क्षमतेपर्यंत ऐकण्याची क्षमता आपल्या कानातं असते. कान केवळ ६५ डेसिबल आवाज सहन करू शकतात. मात्र आपण सातत्याने इअरफोन्सचा वापर केल्यास बहिरेपण येण्याची शक्यता असते. याशिवाय झोप न येणे, मानसिक ताण, नैराश्य आणि सतत होणारी डोकेदुखी याचे कारण सतत वापरले जाणारे हेडफोन्स असू शकते. दहा मिनिटांपर्यंत इअरफोन्स कानात लावून ठेवल्यास कानातल्या पेशी मरतात. त्यामुळे जिवाणूंची वाढ सातत्याने होते आणि कानात संसर्ग होत राहतो.

Post a Comment

Previous Post Next Post