भाजपच्या 'या' नेत्यामुळे नाईलाजाने स्वेच्छानिवृत्ती घेतली; माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक खुलासा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

देशाचे माजी अर्थ सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी शनिवारी मोदी सरकारच्या अन्यायकारक कारभाराचा बुरखा फाडला. मोदी सरकारचा दुसरा कार्यकाल सुरू होत असतानाच मला अर्थ मंत्रालयातून बाहेर काढण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशी माझे चांगले संबंध नव्हते. त्यातूनच त्यांनी माझी तडक ऊर्जा मंत्रालयात बदली केली. याच अन्यायामुळे मला मुदतीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली, अशी खदखद गर्ग यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केली.

निर्मला सीतारामण यांनी अर्थमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर अवघ्या महिनाभरातच म्हणजेच जून 2019 मध्ये माझ्या बदलीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मी नियमानुसार 31 ऑक्टोबर 2020 रोजी सेवानिवृत्त होणार होतो. मात्र सीतारामण यांनी मनमानी व जाचक तंत्र अवलंबत मला स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडले. त्यांनी माझ्याबाबत आधीपासूनच कलुषित दृष्टीकोन बनवला होता. त्यामुळे त्यांचे आणि माझे विचार कधीच जुळले नाहीत. त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता, असेच वाटत होते.

त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे मुश्किल असल्याची कल्पना मला सुरुवातीपासून आली होती, असे गर्ग यांनी नमूद केले आहे. याचवेळी त्यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबतच्या संबंधांवर समाधानकारक भावना व्यक्त केली आहे. जेटली यांचा आर्थिक विषयांचा गाढा अभ्यास होता, त्यांना अर्थविषयक सखोल जाणीव होती, असे त्यांनी म्हटले आहे.
 

बजेटपूर्वीच मला बाहेर काढायचे कारस्थान होते!
सीतारामण यांनी मला जुलै 2019 च्या बजेटपूर्वीच अर्थ मंत्रालयातून बाहेर काढण्याचे कारस्थान केले होते. परंतु सरकारने त्यांची मागणी मान्य केली नव्हती. सीतारामण यांच्या त्रासाला कंटाळून मीसुद्धा बजेटपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेणार होतो. मात्र बजेटची तयारी करण्यासाठी थांबलो. सितारमण यांच्याशी विविध महत्त्वपूर्ण मुद्यांवरील गंभीर मतभेद पुढे येत होते. त्यामुळे मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेरून आर्थिक सुधारणांबाबत काम करण्याचा निर्णय घेतला होता, असे गर्ग यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post