युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास वंचित घटकांना मोठा आधार मिळेल : अभिषेक कळमकर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

टीम हँगर वॉरियर्स व फीडिंग इंडियाच्या वतीने वंचित घटकातील मुलांची दिवाळी गोड करुन बालदिना निमित्त त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कोठी येथील वंचित घटकातील मुलांना माजी महापौर अभिषेक कळमकर व शम्स हाजी समीर खान यांच्या हस्ते खाऊचे वाटप झाले. यावेळी फक्रुद्दीन हकीमजीवाला, नुमेर शेख, नदीम शेख, अफान सोलापूरे, सलमान सय्यद, जीशान शेख, अमजद शेख आदींसह युवक उपस्थित होते.


माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की, वंचित घटकातील मुलांचा बालदिन व दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. युवकांनी पुढाकार घेऊन घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. ग्रुपच्या वतीने टाळेबंदी काळात देखील गरजूंना विविध प्रकारची मदत करण्यात आली होती. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास वंचित घटकांना मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post