आळस आणि कमजोरीने त्रस्त असाल तर रोज करा अर्ध नवासन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक असते. कोरोनाच्या काळात आरोग्य चांगले राखणे हे एक आव्हानच बनले आहे. यासाठी दररोज काही वेळ योगासने करणे उत्तम. जर आपल्यालाही आळसावलेले वाटते आणि अशक्तपणा जाणवतो तर रोज काही मिनिटे अर्धनवासन करा आणि उत्साहित राहा.

काय आहे अर्धनवासन किंवा नौकासन?
यामध्ये आपण जमिनीवर अशाप्रकारे बसता जेणेकरून आपल्या शरीराचा आकार नावेसारखा दिसतो. यासाठी संपूर्ण शरीराला काम करावे लागते. यामुळे शरीरातील रक्तपुरवठा वाढतो आणि संपूर्ण शरीर वर्किंग मोडवर येते. लक्षात ठेवा की हे आसन करताना आपली पाठ आणि पाय दोन्ही पूर्ण सरळ असायला हवेत.

टप्प्याटप्प्याने असे करा अर्धनवासन

 • अर्धनवासन करण्यासाठी आपण अशी सुरुवात करू शकता.
 • चटई किंवा जमिनीवर सरळ बसा.
 • आपले पाय समोर पसरा. ही प्रारंभिक स्थिती आहे. यावेळी आपली पाठ पूर्ण सरळ ठेवा.
 • हळूहळू आपले पाय आणि गुडघे दुमडा.
 • आपले हात आधारासाठी पाठीच्या मागे जमिनीवर ठेवा आणि आसनाला सुरुवात करा.
 • आपले पाय उचला.
 • आता आपल्या पेल्विक हाडांवर तोल सांभाळा आणि एक मजबूत योगमुद्रा घ्या.
 • गुडघ्यांपासून खाली आपल्या पायांसमोर आपले हात सरळ करा आणि योगमुद्रेत शरीराचा तोल सांभाळा.
 • आपली पाठ शक्य तितकी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • अशाच स्थितीत जितका वेळ बसणे शक्य आहे तितका वेळ बसा.
 • दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स राहा.
 • यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण मुद्रा करा.

अर्धनवासनाचे फायदे
 • आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत होतात.
 • शरीरक्षमता वाढते.
 • रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती वाढते.
 • ग्रंथी उत्तेजित होण्यास मदत होते.
 • मासिक पाळी आणि हार्मोनल असंतुलन नियंत्रित राहते.
 • मू्त्रपिंडे तंदुरुस्त राहतात.

या गोष्टी लक्षात ठेवा
 • जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण भिंतीच्या आधाराने हे आसन करा.
 • गर्भवती महिलांनी हे आसन करू नये
 • मासिक पाळी सुरू असतानाही हे आसन करणे टाळावे.
 • हृदयरोग आणि रक्तदाब असल्यास हे आसन करू नये.
 • डायरिया आणि दम्याचा त्रास असल्यास नौकासन करू नये.


Post a Comment

Previous Post Next Post