एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण दातदुखीमुळे त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. खरंतर दात खराब होण्याची अनेक कारणे आहेत. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न घासणे या सगळ्या वाईट सवयींमुळे दात दुखणे, किडण, दात कमकूवत होऊन पडणे अशा समस्या निर्माण होतात. यामध्येच दातदुखी ही सध्याच्या काळात मोठी समस्या झाली आहे. मात्र जर या दातदुखीपासून सुटका करुन घ्यायची असेल तर या घरगुती उपायांचा नक्कीच वापर करुन पाहिला पाहिजे.
१. मीठाच्या पाण्याने गुळण्या
अनेक वेळा दातांना कीड लागल्यावर दात दुखतात किंवा अनेक जणांना थंड पाणी प्यायल्यावरही दातांना ठणका लागतो. अशावेळी एक ग्लास कोमट पाण्यात दिड चमचा मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
२. लसूण
प्रत्येक पदार्थाची चव वाढविणारा लसूण दातदुखीमध्येही गुणकारी आहे. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करुन ती दात दुखत असलेल्या भागावर लावावी.
३. लवंग
मसाल्याच्या पदार्थात महत्त्वाचं स्थान असलेल्या लवंगमुळे दातदुखी बरी होण्यास मदत मिळते. जो दात दुखत आहे. त्या दाताखाली लवंग दाबून धरावी व हळूहळू ती चावायचा प्रयत्न करावा. त्यातून निघणाऱ्या रसामुळे दातात कीड असल्यास ती मरुन जाते. तसंच लवंगचं तेलदेखील वापरता येऊ शकतं. लवंगाच्या तेलाचे २ थेंब कापसावर घेऊन तो कापूस दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवावा.
४. मोहरीचं तेल
मोहरीचं तेल आणि चिमुटभर मीठ एकत्र करुन या पेस्टने दात आणि हिरड्या घासाव्यात. त्यामुळे दातदुखी थांबण्यासोबतच हिरड्या मजबूत होतात.
५.मीरपूड
पाव चमचा मीठ घेऊन त्यात चिमुटभर काळीमिरी पूड टाकावी. नंतर या पावडरने दात घासावेत. काही काळातच याचा फरक जाणवू लागतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment