फ्रोझन फुड खाताय… तर होऊ शकतो हा गंभीर आजार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलत्या लाईफस्टाईलनुसार खाण्याच्या सवयींही बदलल्या आहेत. वेळेचे गणित कोलमडल्याने किंवा पॅक्ड फुडवर ताव मारणाऱ्यांची संख्या वाढतेय. याचा गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होत असून यातील ग्लुकोज आणि स्टार्चच्या अतिरिक्त वापरामुळ कॅन्सरचाही धोका वाढत आहे.

सोडियमची मात्रा जास्त
पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रोझन फुडमध्ये वापरण्यात येणारे घटक शरीरासाठी हानिकारक असतात. यात असलेल्या सोडीयमच्या जास्त प्रमाणाचा काही वेळा मेंदुवर विपरीत परिणाम होत असतो. या पदार्थांची सवय टाळा.

डायबिटीजचा धोका
फ्रोझन फुड ताजे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्च मुळे डायबिटीज होण्याचा धोका असतो. हे स्टार्च अन्न ताजे दिसण्याबरोबरच चविष्ट ठेवण्यासाठी वापरले जाते. याचे सेवन केल्यामुळे यात असलेल्या ग्लुटेनचे रूपांतर शुगरमध्ये होते. ही शुगर डायबिटीज वाढवण्याबरोबरच इतर अवयवांचे देखील नुकसान करते.

घ्या हृदयाची काळजी
फ्रोझन फुड किंवा प्रोसेस्ड फूडमुळे हृदयरोगासारखे आजार होण्याची शक्यता असते. या अन्नप्रकारात समाविष्ष्ट असलेले ट्रान्सपॅâट्स हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या समस्या वाढवते. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवत असल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळे शरीरातील सोडियमची मात्रा वाढत असल्याने रक्तदाबाचा धोका वाढतो.

कॅलरीज वाढतायत
फ्रोझन फुडचा समावेश आहारात जास्त आहे… तर मग कॅलरीज मीटरवर लक्ष ठेवा. फ्रोझन फुडमध्ये असलेले फॅट्स कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन च्या तुलनेत दुप्पट मात्रेत कॅलरी वाढवतात. जसे की एक कप फ्रोझन चिकन मध्ये साधारणतः ६०० कॅलरीज असतात. हे जास्त करून फॅट्समधून येतात. मात्र बाजारात मिळणाऱ्या फ्रोझन फुडला हेल्दी फुड सांगून फसवणूक केली जाते. हे आरोग्यासाठीही तितकेच हानीकारक आहे.

कॅन्सरचा धोका
जास्त प्रमाणात प्रâोझन पूâड खाल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणात फ्रोझन चिकन तसेच मटणमध्ये कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक वाढीस लागतात. यामुळे हॉट डॉग, मसालेदार नॉनवेज किंवा सॉसेजेस् खााल्याने कॅन्सर पेशींचा धोका वाढू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post