मटार खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या मटार खाण्याचे फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

प्रत्येक भाजीला विशिष्ट महत्त्व असतं. त्यामुळे आहारात प्रत्येक भाजीचा समावेश करायला हवा. त्यातच प्रत्येक मोसमात येणाऱ्या काही ठराविक भाज्यांच्या येत असतात. त्यामुळे ऋतूनुसार येणाऱ्या भाज्यादेखील आवर्जून खायला हव्यात. त्यातच सध्याच्या घडीला काही भाज्या या बाराही महिने उपलब्ध असतात. त्यातलीच एक भाजी म्हणजे मटारचे दाणे. खासकरुन थंडीच्या दिवसात येणारे हे मटार आजकाल कोठेही सहज उपलब्ध होतात. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्यांच सेवन केलं पाहिजे. चला तर मग पाहुयात मटार खाण्याचे फायदे..

मटार खाण्याचे फायदे

१. मटार खाल्ल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

२. रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी मटारचे सूप प्यावे त्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

३. मटारमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे बध्दकोष्ठतेच्या त्रासावर मटार गुणकारी ठरतात.

४. मटारमध्ये प्रथिन्यांबरोबरच ‘क’ जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी मटार उपयुक्त ठरतो.

५. भाजलेल्या ठिकाणी मटारची पेस्ट करून लावली तर लगेच आराम मिळतो आणि होणारी जळजळही कमी होते.

६. काहीजण मटारची पेस्ट करून तिचा वापर स्क्रब सारखाही करतात, यामुळे त्वचा उजळते.

अनेक लहान मुलं मटार खात नाहीत. त्यामुळे मुलांसाठी खास मटार-पनीर, मटार-पुलाव, आलुमटार, मटाराचे कटलेट, मटार हलवा असे पदार्थ करता येऊ शकतात. तसंच अनेकजण मटारचे दाणे फ्रिजरमध्ये साठवून ठेवतात आणि नंतर मोसम निघून गेला तरी ते जेवणात वापरतात पण असं करणं चुकीचं आहे. कारण, यामुळे मटारमधील पोषणमुल्ये कमी होतात.

Post a Comment

Previous Post Next Post