केसांना मेहंदी लावण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बदलत्या काळानुसार तरुणाईचा फॅशनसेन्सदेखील बदलत जातो. त्यामुळे बाजारात कोणताही नवा ट्रेण्ड आला की तरुणी तो फॉलो करण्याच्या मागे जाते. यामध्येच सध्या केस हायलाइट करणे किंवा केसांना कलर करणे याचा ट्रेण्ड असल्याचं दिसून येतं. मात्र या ट्रेण्ड फॉलो करण्याच्या नादात बऱ्याच वेळा केसांना हानी पोहोचताना दिसते. कारण केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये अनेक हानीकारक केमिकल्स असतात. मात्र याला पर्याय म्हणून आजही अनेक जण मेहंदी लावतात. बाजारात केसांना लावण्यासाठी काळी किंवा लाल अशा दोन पर्यायांची मेहंदी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे यामुळे केसांना कोणताही अपाय होत नसून त्यामुळे केसांना फायदाच मिळतो. त्यामुळे केसांना मेहंदी लावण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

केसांना मेहंदी लावण्याचे फायदे

१. पांढऱ्या केसांना नवीन रंग येतो. काळी मेहंदी वापरली तर केस नैसर्गिकरित्या काळे असल्याप्रमाणे वाटतात.

२. केसांचं आरोग्य सुधारतं.

३. केसांना चकाकी येते.

४. केसांचा पोत सुधारतो आणि ते मऊ होतात.

५. केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.

६. कोंडा होण्याची समस्या दूर होते.

७. केसांची वाढ होते.

८. नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्यामुळे केसांना हानी पोहोचत नाही.

९. डोकं शांत राहतं.

मेहंदीचा वापर कोणी करु नये

१. सतत डोकेदुखीने त्रस्त असणाऱ्यांनी

२. सर्दी, पडसं, ताप असल्यास मेहंदी लावू नये.

३. लहान मुलांना लावू नये.

४. मेहंदी महिन्यातून केवळ १ किंवा २ वेळाच लावावी.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post