हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारींसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आहारातील काही पदार्थांमध्ये आपण लसूण खातो. पण दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश असेलच असे नाही. पण लसणामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक उपयुक्त घटक असतात. आहारात ६ रसांचा समावेश असावा असे आपण कायम ऐकतो. विशेष म्हणजे लसणामध्ये आंबटपणा सोडून इतर ५ ही रस असतात. त्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ समजला जातो. आयुर्वेदात परिपूर्ण आहारद्रव्य म्हणूनही लसणाची ओळख आहे. लसणाच्या कंदापासून पानाच्या टोकापर्यंत सर्व घटक शरीरासाठी उपयुक्त असतात. हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारी यांसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे हे आहेत फायदे..

१. लसूण आणि त्याच्या पातीची चटणी जेवणात चव तर आणतेच पण ती चवीलाही खूप रुचकर लागते. ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही चटणी म्हणजे अतिशय उत्तम उपाय आहे.

२. साधारणपणे हिवाळ्यामध्ये ओला लसूण बाजारात मिळतो. तो कमी तिखट आणि कमी उग्र असतो. त्यामुळे ज्यांना लसूण आणि त्याचा वास आवडत नाही त्यांच्यासाठी हा लसूण म्हणजे उत्तम पर्याय ठरु शकतो.

३. ताप आणि इतर कारणांमुळे ज्यांच्या तोंडाला चव नसते त्यांनी आवर्जून ४ ते ५ दिवस लसणाची फोडणी दिलेले अन्न खावे. त्यामुळे तोंडाची गेलेली चव येण्यास मदत होते.

४. लसूण उष्ण पदार्थ असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी लसूण खाणे टाळावे. एखादवेळी हिवाळ्यात खाणे ठिक आहे पण उन्हाळ्यात लसूण खाणे टाळावे.

५. लसूण बुद्धीवर्धक असून ज्यांना लक्षात ठेवण्यात अडचणी येतात त्यांनी जरुर लसूण खावा. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांनी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास चांगला उपयोग होतो.

६. दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्यांनीही लसूण खावा. याशिवाय सतत आळस, झोप, थकवा वाटत असल्यास ते कमी होण्यासाठीही लसणाचा चांगला उपयोग होतो.

७. ज्यांना कफ आणि दम्याचा त्रास होतो त्यांनी सकाळी उठल्यावर (उपाशीपोटी) दोन पाकळ्या लसणाबरोबर गरम पाणी प्यावे. हा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच ब्लडप्रेशरही ( रक्तदाब ) नियंत्रणात राहतो. वैद्यकीय उपचारांबरोबर हा उपाय केल्यास लवकर बरे होण्यास मदत होते.

८. लसूण खाल्ल्यानं रक्ताच्या गाठी बनत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध एकत्र करून खाल्ल्यानं हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होतात. त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.

९. लसूण अॅसिडिटी होण्यापासून रोखतो. तसेच ताण-तणाव कमी करण्यासही सहाय्य करतो

१०. लसूण श्वसनाशी संबंधित विकारांमध्ये फायदेशीर ठरतो. सर्दी, खोकला, अस्थमा, न्यूमोनिया या विकारांमध्ये लसणाचे सेवन फायदेशीर आहे. यासाठी लसूण घालून दूध उकळावे आणि ते पिण्यास द्यावे. त्यामुळे खोकला, दमा या विकारांमध्ये आराम मिळतो. लसूण किटकनाशक असल्यानं टीबीचे विषाणू मरण पावतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post