डोकेदुखीपासून ते कफाचा त्रास! कडू कारलं ‘या’ आजारांवर ठरतं गुणकारी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारात कायम सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. मात्र अनेकदा पालेभाज्या किंवा कारले, वांगी अशा भाज्या खाणं अनेक जण टाळतात. यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अनेक मोठी माणसंदेखील कारलं किंवा तत्सम भाजी पाहिली की नाकं मुरडतात. मात्र या भाज्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्यामुळे आज कारलं खाण्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात.

कारलं खाण्याचे फायदे

१. कारल्यामुळे रक्तशुद्ध होते.

२. त्वचाविकार होत नाहीत.

३. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.

४. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.

५. यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.

६. पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.

७. कफाचा त्रास होत असल्यास कारल्याच्या रसाचं सेवन करावं.

८. पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास कारल्याच्या रसामुळे त्रास कमी होतो.

९. कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post