लवंग.. या रोगांवर आहे रामबाण इलाज..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लवंग ही स्वयंपाकघरातल्या मसाल्यांमधील महत्त्वाचा घटक… लवंग दिसायला लहान असली तरी ती बहुगुणी आहे. आहारात पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी लवंग उपयोगी आहेच. त्याचसोबत लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. डोकेदुखी, सर्दी, पडसे यासारख्या रोंगावर लवंग रामबाण इलाज आहे. लवंगमध्ये अनेक गुण असल्याने नेहमीच्या आहारात आणि मसाल्यांमध्ये वापरण्यात येते.

लवंगमध्ये लोह, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडियम, हाइड्रोक्लोरिक अॅसिड, विटामिन ए, विटामिन सी, मॅगेनिज आणि फाइबर हे घटक असतात. हे घटक शरीरासाठी आवश्यक असतात. तसेच लवंग नैसर्गिक पेनकिलर आहे. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास कपड्यात बाधूंन सुगंध घेतल्यास त्रास कमी होतो.

दातदुखीवरही लवंग रामबाण इलाज आहे. दात दुखत असल्यास लवंग तेल लावल्यास दातदुखी थांबते. लवंगमध्ये असलेल्या अँटीबॅक्टीरियल घटकांमुळे अनेक टूथपेस्टमध्येही त्याचा वापर करण्यात येतो. सांधेदुखी आणि सूज येण्याचा त्रास असल्यास लवंग उपयोगी ठरते. सांधुदुखी असल्यास इतर तेलात मिसळून लवंग तेलाने मसाज केल्याने त्रास कमी होतो.

सर्दी,कफ, दमा, ब्राँक्रायटीस, सायनस असल्यास लवंग तेलाच्या वापराने फायदा होतो. पचनाची समस्या असल्यास लवंग वापरल्याने पचनक्रिया सुधारते. लवंगाचा आहारात समावेश केल्यास अपचन, मळमळ, डायरिया आणि गॅस या समस्या कमी होतात. लवंगमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्याने अनेक औषधांमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. लवंगमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरातील साखर नियंत्रणात राहत असल्याने मधुमेहींनाही त्याचा फायदा होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post