खारीक खाण्याचे 11 फायदे, जाणून घ्या..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

खजुराची बहीण असणारी खारीक शरीरासाठी उपयुक्त आहे. वर्षभर बाजारात उपलब्ध असणारी खारीक कधीही सेवन केली जाऊ शकते. याचे शरीराला अनेक फायदे होतात. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या लैंगिक जीवनात खारकाचे विशेष स्थान आहे. तसेच शरीर सुदृढ बनवण्यासाठी खारीक आहारात असायलाच हवी. जाणून घेऊया फायदे…

1. प्रसुतीनंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि बाळांत महिलेला ताकद येण्यासाठी खारीक खाण्यास सांगितले जाते.

2. मासिक पाळीचा त्रास असल्यास नियमित खारीकचे सेवन केल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

3. खारीक खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि चपळता वाढते.

4. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराची आयर्नची गरज भागविण्यासाठी खारीक खाणे महत्वाचे आहे.

5. खारीक वीर्यनिर्मितीचा स्तोत्र असून याचे रोज दुधासोबत सेवन केल्यास लाभ होतो. तसेच नियमित सेवन केल्यास नपुंसकतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

6. खारीकमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणास राहते.

7. खारकेत फायबर, जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी 3, बी 5 आणि पोटॅशियमही आहे. लहान मुलांना योग्य प्रमाणात दिल्यास तब्येत सुधारण्यास मदत होते. तसेच यामुळे भूक वाढण्यासही मदत मिळते.

8. रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत खारकेचे सेवन केल्याने ऊर्जा वाढते आणि लैंगिक जीवन आनंददायी होते.

9. खारकेचे नियमित सेवन केल्याने श्वसनाचा त्रास (दमा) असणाऱ्या रुग्णांना आराम मिळतो आणि हृदयविकाराचा त्रास कमी होतो.

10. खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे लाभदायक आहे.

11. खारीकमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन बी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे त्वचेला चकाकी येण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post