कवठ फळ खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कवठ हे फळ फार कमी जणांना माहित असेल. कठीण आवरण असलेलं हे फळ चवीला थोडसं आंबड, गोड असं असतं. याला वुड अॅपल असंदेखील म्हटलं जातं. अनेक ठिकाणी हे फळ उपवासाच्या दिवशीदेखील खाल्लं जातं. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात. विशेष म्हणजे कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. भूक लागत नसल्यास किंवा कमी झाल्यास कवठ खावं.

२.मळमळ, उलटी होत असल्यास कवठ खावे. त्यामुळे त्रास कमी होतो.

३. जुलाब होत असल्यास कवठ खावे.

४. अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो.

५. कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात.

६. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.

सावधानता
कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post