नाचणी नकोशी वाटते? मग ‘हे’ १३ फायदे वाचून नक्कीच कराल आहारात समावेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

निरोगी आरोग्यासाठी आणि योग्य शारीरिक वाढ होण्यासाठी सकस आहार आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणं तितकंच गरजेचं आहे. भारतीय जेवणामध्ये गोड पदार्थापासून ते कडू पदार्थापर्यंत प्रत्येक घटकाचा समावेश असतो. आपल्या आहारात पोळी, भाजी, भात, आमटी या पदार्थांसोबतच भाकरीचा समावेश करणंदेखील तितकंच गरजेचं आहे. साधारणपणे अनेकांच्या घरी तांदूळ, ज्वारी, बाजरी यांच्या भाकरी केल्या जातात. परंतु, नाचणीची भाकरी हीदेखील शरीरासाठी तितकीच गुणकारी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे चला तर आज जाणून घेऊयात नाचणी खाण्याचे फायदे.

दर आठवडय़ाला एखादा तरी रुग्ण असा भेटतो की जो मी ‘नाचणी खाऊ का’ असे विचारतो. रोगी माणसाकरिता नाचणी चांगली ही सर्वाना माहीत असणारी माहिती आहे. पण नाचणी ही सर्वानाच पौष्टिक आहे, अशी एक चुकीची समजूत आहे. पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च असणाऱ्या पदर्थात भात, वऱ्याचे तांदूळ या वर्गात नाचनीचा क्रमांक शेवटचा आहे.

१. नाचणी पचण्यास हलकी आहे. त्यामुळे आजारी व्यक्तीस अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे.

२. अजीर्ण होणे, पोटात वायू धरणे, पोटदुखी, आमांश, अपचन या तक्रारी नाचणी खाल्ल्याने दूर होतात.

३. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहतं.

४. चणा, हरभरा, उडीद, पोहे, शेंगदाणे, बटाटा हे पदार्थ शरीर बृंहण करण्याचे कार्य करतात. ते काम नाचणी करणार नाही. नाचणी पोटाला त्रास न देता जीवनरक्षणापुरते पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते.

५. नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन:पुन्हा त्रास देणाऱ्या रोगांत होतो.

६. नाचणीला कधी कीड लागत नाही त्यामुळे ती वर्षभर आरामात साठवून ठेवता येऊ शकते.

७. अनेक वेळा डॉक्टर लहान मुलांना नाचणी सत्व देण्यास सांगतात.

८. नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण दोष कमी करते.

९. कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी.

१०. नाचणीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

११. गोवर व कांजिण्या तसेच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते.

१२. फोड फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे.

१३. केस गळत असल्यास नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग करावा. या राखेने केस धुवावेत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post