पोहे खाण्याचे ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बऱ्याच वेळा सकाळी ब्रेकफास्ट म्हणून घरातील स्त्रिया पोहे, उपमा, सांजा, शिरा असे अनेक ना-ना विविध पौष्टिक पदार्थ करत असतात. हे पदार्थ पचायला हलके आणि पोटभरीचे असल्यामुळे त्यांना गृहिणींची अधिक पसंती असते. परंतु, हे पदार्थ केवळ पोट भरण्याचंच काम करत नसून त्याचा आरोग्यासाठीदेखील तितकाच फायदा आहे. या पदार्थांपैकी पोह्यांविषयी जाणून घ्याचं झालं तर पोहे खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पोहे खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. वजन कमी होते
पोह्यांमध्ये कॅलरीजची मात्रा कमी असते. त्यामुळे पोहे खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. एक मोठी वाटी पोह्यांमध्ये केवळ २०६ कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी पोह्याचं सेवन करणं फायदेशीर आहे.

२. पोषक घटकांचा समावेश
सुपरफूड म्हणूनदेखील पोह्यांकडे पाहिलं जातं. एक मोठी वाटी पोह्यांमध्ये ७५ टक्के कार्बोहायड्रेट, ८ टक्के प्रोटिन, आर्यनस पोटॅशियम, व्हिटामिन ए,सी आणि डी यांचं पुरेपूर प्रमाण असतं.

३. शारीरिक उर्जा वाढते
दिवसभर काम केल्यामुळे प्रचंड शारीरिक थकवा जाणवतो. परंतु सकाळी नाश्त्याला पोहे खालल्यास दिवसभरात येणारा ताण कमी होते. पोहे खाल्ल्यामुळे शरीरातील काम करण्याची ऊर्जा वाढते. त्यामुळे पोह्यांसोबत सोयाबीन, सुकामेवा, अंडी हे पदार्थ खावेत.

४. भूकेवर नियंत्रण
पोहे पचायला हलके असल्यामुळे पोट पटकन भरतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही.

५. पचनक्रिया सुरळीत होते
पोह्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. तसंच रक्तप्रवाह नियंत्रणात होतो.

Post a Comment

Previous Post Next Post