बहुगुणी अमसूल! आहारात समावेश केल्यास होतील ‘हे’ फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आयुर्वेदामध्ये कोकम या फळाला विशेष महत्त्व आहे. चवीला आंबट, गोड असणाऱ्या या फळामध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे जेवणाची चव वाढविण्यासोबतच या फळाचा उपयोग औषधी पदार्थांमध्येही केला जातो. कोकमपासून ते तयार करतात. तसचं त्याची साल वाळवून अमसूल तयार केले जातात. अनेक घरांमध्ये आमटी, भाजीची चव वाढविण्यासाठी अमसूलाचा वापर केला जातो. विशेष म्हणजे अमसूलाचे अन्यही काही फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात अमसूल खाण्याचे फायदे.

अमसूल खाण्याचे फायदे

१. कोकम फळाच्यावर असलेल्या सालीला अमसूल असं म्हणतात. अमसूलामुळे पित्त शमतं. ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी रोज जेवणात आमटी, भाजीमध्ये २-३ अमसूल टाकावेत.

२. पोटात मुरडा येत असेल तर दोन थेंब कोकम तेल घेऊन हलक्या हाताने मालिश करावी.

३.अनेक वेळा काहींचं पित्त उफाळून आल्यानंतर त्यांच्या अंगावर लाल पुरळ उठणं, अंगाला खाज येणं, त्वचा लाल आणि गरम होणं असे प्रकार घडतात. अशा वेळी राबी अमसूल पाण्यात कुस्करुन तो लेप कापूर आणि मिरपूड घालून त्वचेवर चोळावा. तसंच अमसूल तासभर पाण्यात भिजवून त्यात साखर-मीठ घालून ते पाणी प्यावं.

४. जखमा भरणे, खाज कमी करणे या गुणांमुळे अनेक मलमांमध्ये अमसुलाच्या बियांचे तेल वापरतात.

५. उष्णता कमी करणे, अशक्तपणा, मानसिक ताण, थकवा कमी करण्यासाठी सोडायुक्त शीतपेयांपेक्षा कोकम सरबत प्यावे.

दरम्यान, कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाते. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा अमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात.

Post a Comment

Previous Post Next Post