थंडीच्या दिवसात रोज मुळा खाण्याचे 'हे' आहेत फायदे..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडीच्या दिवसात भूक वाढत असल्याने आहारात योग्य ते बदल करून शरीराला आवश्यक असलेल्या घटकांचा पुरवठा सहज करता येतो. थंडीच्या दिवसात सहजतेने मुळा उपलब्ध असतो. अनेकजण सलाडमध्ये त्याचा वापर करतात. थंडीच्या दिवसात मुळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यापासून रक्तदाब, हृदयरोग यापासून बचाव होण्यास मदत होते. अशा बहुगुणी मुळ्यामुळे होणारे फायदे जाणून घेऊयात.

मुळ्यांमध्ये विटामीन सी मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच कफ-सर्दी यापासून शरीराचे संरक्षण होते. शरीराला सूज येत असल्यास सूज कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यासाठीही मुळे उपयोगी आहेत. तसेच मुळ्यांच्या नियमित सेवनाने तरुण दिसण्यास मदत होते. मुळ्यांमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास आहारात मुळ्यांचा समावेश करावा.

मुळ्यांमध्ये अँथोसायनिन चांगल्या प्रमाणात असल्याने ते हृदयासाठी लाभदायक आहे. त्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते. दररोज मुळ्यांचे सेवन केल्याचे हृदयरोगाचा धोका कमी होतो. मुळ्यांमध्ये फॉलीक अॅसिड आणि फ्लेवोनॉयड्स चांगल्या प्रमणात असल्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत नाही. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने उत्साह दिवसभर टिकतो.

दररोज नियमित मुळ्याचे सेवन केल्यास शरीरात फायबरचे प्रमाण कमी होत नाही. फायबरमुळे पचनाच्या प्रक्रियेला मदत होते. त्याचप्रमाणे यकृत आणि मूत्राशयासाठीही मुळे फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य सुधारते. मुळ्यांमध्ये कोलेजन असते. त्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात. मुळ्याच्या नियमित सेवनाने अॅथेरोस्क्लेरोसिससारखा गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो.

पचनक्रिया सुधारण्यासोबतच अॅसिडिटी, स्थूलता, पोटाचे आजार असल्यास मुळे खाण्याने फायदा होतो. त्वचेला तजेला आणण्यासाठीही मुळे खाण्याने फायदा होतो. त्वजेची चमक वाढवण्यासाठी मुळ्याचा ज्यूस पिण्याने फायदा होतो. मुळ्यात असणारे विटामीन सी, फॉस्फरस असल्याने पिंपल्स आणि कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळते. मुळ्यांचा रस केसांना लावल्याल कोंड्याची समस्या कमी होते आणि केस मजबूत होतात.

मुळ्यामध्ये विटामीन ई, ए, सी, बी 6 आणि के आहेत. तसेच फायबर, जस्त, पोटॅशियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, मँगनिज आहे. या घटकांमुळे शरारीला आवश्यक असलेले सर्व घटक मिळतात. त्यामुळे शरीराची तंदुरुस्ती वाढण्यास मदत होते. सलाडमध्ये, पराठ्यामध्ये किंवा भाजी बनवून मुळ्याचा आहारात समावेश करता येतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post