औषधापेक्षा कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सर्वसामान्यपणे आपण पिकलेली केली खातो. मात्र कच्ची केळी पिकलेल्या केळीपेक्षा जास्त फायदेशीर असतात. कच्ची केळी पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते. यासह व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी देखील कच्ची केळीत मुबलक प्रमाणात आढळते. जाणून घेऊया फायदे…

वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकदा आपण केळी खाण्याचे टाळतो. मात्र कच्ची केळी खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कच्ची केळी हा तंतूमय पदार्थांचा (फायबर) महत्त्वाचा स्त्रोत आहे. ज्यामुळे अनावश्यक फॅट सेल्स बाहेर टाकण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर प्रभावी
कच्च्या केळीमध्ये असणाऱ्या फायबर आणि स्टार्च यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते. फायबर आणि स्टार्च आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

भूक नियंत्रणात राहते
कच्च्या केळीत असणाऱ्या फायबर आणि इतर घटकांमुळे भूक नियंत्रणात राहते. यामुळे वेळी-अवेळी भूक लागत नाही.

मधुमेहावर नियंत्रण
मधुमेह प्राथमिक स्टेजला असेल तर आत्तापासूनच कच्ची केळी खाण्यास सुरुवात करा. यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

पचनक्रिया होते चांगली

कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या केळीमुळे हहाडे मजबूत होण्यासही मदत होते. तसेच कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

(अनेकांना केळी खाल्ल्याने कफचा त्रास होतो त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे)

Post a Comment

Previous Post Next Post