केसांच्या सौंदर्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत सोयाबीन खाण्याचे १० फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे सोयाबीनच्या बी प्रमाणेच त्याची अन्य उत्पादनांचादेखील शरीरासाठी तितकाच फायदा होतो. इतकंच नाही तर अलिकडे पाहायला गेलं तर सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोयाबडी (सोया नगेट) दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं पाहायला मिळतं. चला तर मग पाहुयात सोयाबीन खाण्याचे फायदे.

१. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीन गुणकारी आहे.

२. हडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढविण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे.

३. हृदयासंबंधित आजार दूर ठेवते.

४. वजन नियंत्रणात राहते.

६. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

७. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

८. निद्रानाश दूर होतो.

९. केसांची वाढ होते.

१०. त्वचेचा पोत सुधारतो.

Post a Comment

Previous Post Next Post