अंगणातील डॉक्टर म्हणून ओखळल्या जाणाऱ्या तुळशीचे हे आहेत फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तुळस ही अनन्यसाधारण महत्त्व असणारी वनस्पती. तुळस वर्गात २६ प्रकारच्या वनस्पती आहेत. या सर्व सुगंधी व झुडूप प्रकारात मोडतात. या सर्व पौष्टिक, ज्वरघ्न, उत्तेजक, बल्य व कृमिघ्न आहेत. सर्वाना वास येतो, सर्वात कडू रस असतो. तुळशीत प्रमुख दोन प्रकार आहेत. कृष्ण व श्वेत. काळी म्हणजे कृष्णतुळस व श्वेत म्हणजे वैजयंती तुळस. कृष्ण तुळसचे सर्व भाग औषधात वापरतात. मंजिऱ्या (फुले) येण्यापूर्वी तुळशीच्या झाडात औषधी गुणधर्म पूर्णपणे भरलेले असतात. औषधात वापरताना मंजिऱ्या आलेली तुळस वापरू नये.

तुळस शीतप्रधान रोगात वापरतात. ज्वरात तुळशीचा अंगरस मिरपूडबरोबर देतात, तर अंगदुखी फार असल्यास ओवा व निर्गुडीबरोबर देतात. सर्दीच्या ज्वरात, कफासाठी तुळशीचा रस मधाबरोबर देतात. हिवताप असणाऱ्या ठिकाणी तुळस लावल्यास हिवताप येत नाही. म्हणजेच आपल्याकडे तुळशीची झाडे वेगवेगळ्या जागी असतील तर (तुळशीबाग) त्या घरातील व्यक्तींना हिवताप (मलेरिया) होत नाही. तुळस कृमिघ्न आहे. उलटी होत असल्यास तुळशीच्या पानांच्या अंगरसाने ती थांबते. पाहूयात तुळशीचे फायदे..

१. ताप - अनेक वेळा वातावरणात बदल झाला की काहींना लगेच ताप वगैरे सारखे आजार होतात. अशा वेळी दारापुढील तुळस कामी येते. ऑक्सिजन देण्यासोबतच तुळस तापावरही गुणकारी आहे. ताप आल्यानंतर तुळशीच्या पानांचा रस काढावा आणि १ -२ चमचे सेवन करावा त्यामुळे ताप उतरण्यास मदत होते.

२. सर्दी - सर्दी झाल्यानंतर अनेक वेळा नाक चोंदणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होता. अशावेळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होऊ शकते.

३. डोकेदुखी - अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

४. डोळ्यांची समस्या - डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकता कमी होण्यास मदत होते.

५. दातांची समस्या - तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.

६. डास आणि इतर किटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.

७. किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱ्यांनी मध आणि तुळशीच्या पानाचे रस मिश्रित मिश्रण प्यावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post