सूर्यफूलाच्या बिया आहेत गुणकारी; जाणून घ्या फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

प्रत्येक फुलाला त्याचा खास रंग, वास, आकार असतो. त्याचप्रमाणे त्या फुलाचं वैशिष्ट्य आणि महत्त्वदेखील वेगवेगळं असतं. यामध्येच आज आपण सूर्यफूलाविषयी जाणून घेऊ. पिवळ्या रंगाचं मोठं टपोरं फुललेलं सूर्यफूल अनेकांचं लक्ष वेधून घेत असतं. खरं तर सूर्यफूलाचे असंख्य फायदे आहेत. मात्र आपण त्या पासून अनभिज्ञ आहोत. साधारणपणे सूर्यफूलांच्या बियांपासून तेल काढण्यात येते हा एकच उपयोग आपल्याला माहित आहे. मात्र या बियाचे अनेक फायदे आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, कॅल्शिअम, खनिजे असतात. त्यामुळे या बिया खाण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे या बिया खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफूलाच्या बिया या शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी या बिया खाणं फायदेशीर ठरेल.

२.सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं.

३. या बिया प्रचंड पौष्टिक असतात. त्यामुळे त्या खाव्यात. यांचा वापर आपण सलाडमध्येदेखील करु शकतो.

४. सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात.

५. सूर्यफुलांच्या बियामध्ये कॅल्शिअमही असते. त्यामुळे या बियांचं सेवन केल्यास शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post