एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
निर्गुडी ही दोन प्रकारची असते, एक पांढऱ्या फुलांची तर दूसरी निळ्या रंगाची. दोन्हीचे गुणधर्म सारखेच असतात.
निर्गुडीचे फायदे
१. ज्या विकारांमध्ये सूज येते अशा सर्वच विकारांमध्ये पोटातून वा बाहेरून लेप लावण्यासाठी (लेप लावण्यासाठी पानांना बारीक करून गरम करून दिवसातून ३-४ वेळा लावावा) निर्गुडीचा वापर होतो. उदा. वाताच्या आजारामध्ये, आमावातामध्ये, सांध्याल्या येणाऱ्या सूजेमध्ये, फुप्फसाला येणाऱ्या सूजेत.
२. सायटिका मध्ये निर्गुडीच्या पानांचा काढा किंवा रस द्यावा, व पानानेच शेकावे.
३. थंडी वाजून ताप येणे, विषमज्वर, बाळंतीण बाईला येणारा ताप यामध्ये, पानांचा रस किंवा काढा देणे व त्या काढ्यानेच अंग पुसणे.
४. प्लीहा वृद्धी (splenomegaly) मध्ये निर्गुडीचा काढा, हिरडा व गोमूत्र सोबत द्यावे.
५. डोकेदुखीवर पाने बारीक करून लेप लावावा.
६. तळपायाला होणारी आग पाने पायाला बांधल्याने कमी होते.
७. तांदळामध्ये कीडे होऊ नये म्हणून पाने ठेवतात, तसेच पुस्तकामध्ये सुद्धा ठेवतात.

(कोरा या संकेतस्थळावर शुभांगी क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Post a Comment