'तुरटी'चे 'हे' फायदे, औषधीय गुण माहिती आहेत का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बऱ्याच जणांना दाढी केल्यानंतर शेव्हिंग लोशन म्हणून तुरटीचा वापर केला जातो इतकीच माहिती असते. तसंच पाणी शुद्ध करण्यासाठीही तुरटीचा वापर कसा केला जातो याची माहिती बऱ्यापैकी लोकांना माहीत असते. पण त्वचा आणि आरोग्यासाठी तुरटी एका अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी आहे. यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. आता तुम्हाला असाही प्रश्न उद्धवला असेल की, शरीरातील अन्य समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी तुरटीचा उपयोग करता येतो का? तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. तुरटीचे फायदे अनेक आहेत.

तुरटी हा एक रंगहीन रासायनिक पदार्थ आहे. जे दिसायला एखाद्या क्रिस्टलप्रमाणे असते. तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम अल्युमिनिअम सल्फेट असं आहे. तर इंग्रजीमध्ये तुरटीला अलम असं म्हटलं जातं. मात्र तुरटीचे रासायनिक नाव जास्त प्रचलित आहे. अतिशय सामान्य दिसणारी ही तुरटी आरोग्यासाठी मात्र महत्त्वाची आहे.

1) मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. गरम पाण्यात एक कप तुरटीची पावडर टाकून १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. या पाण्याने आंघोळ करा. आठवड्यातून २-३ वेळा असे केल्यास बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.

2) केसांतील उवा व त्याची अंडी या समस्येवर तुरटी हा एक जुना उपाय आहे. तुरटीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे उवा नष्ट होतात.

3) सनबर्न झालेल्या जागी एक कप पाण्यात दोन चमचे तुरटी पावडर टाका आणि प्रभावित जागी लावा. १० मिनिटांनी धुवून टाका.

4) तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे.

5) तुरटीमध्ये अँटी-एजींग घटक असल्यामुळे तुरटीचा वापर केल्यामुळे तुम्ही लवकर वृद्ध दिसत नाही व तुमची त्वचा मऊ व तजेलदार होते.

6) आर्थाराईट्समध्येही तुरटीचा फायदा होतो. गरम पाण्यात तुरटी टाकून शेक दिल्याने आराम मिळतो.

7) मसल क्रॅम्प वर हळदीसह तुरटी लावणे फारच फायदेशीर आहे. कारण तुरटीमध्ये ब्लड थिनींग घटक असतात व हळदीमध्ये अँटीसेप्टीक गुणधर्म असतात यांचा चांगला फायदा होतो.

8) जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा.

9) त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा तुरटी पावडर टाकून स्किनला मालिश करा.

10) ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल.

11) शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्या तुरटीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते.

12) पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post