कणीस आरोग्यासाठी हितकारक; जाणून घ्या त्याचे फायदे..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पावसाळी वातावरणात प्रत्येकाला चवीत बदल हवा असतो. अशा वातावरणात चटपटीत खाण्याचे मन होते. मात्र, कोरोना संकटाच्या काळात बाहरचे खाद्यपदार्थ टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात सहज मिळणाऱ्या मक्याच्या कणसाचा आहारात समावेश करून आपल्याला चवीत बदल करता येतो. तसेच कणीस आरोग्यासाठी हितकारण असल्याने त्याचे फायदेही होतात. कणीस भाजून त्याला तिखट, मीठ, चाट मसाला लावल्यास त्याची चव वाढते आणि चटपटीत खाण्याची इच्छाही पूर्ण होते.

पचनाची समस्या असणाऱ्यांनी कणीस खावे. त्यात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यासाठी याची मदत होते. त्यामुळे पचनासंबधी कोणतीही समस्या असणाऱ्यांनी पावसाळ्यात मक्याच्या कणसाचे सेवन करावे. मक्याच्या कणसात विटामिन ए चे प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांसाठीही याचा फायदा होतो. कणसाच्या सेवनाने डोळ्यांच्या समस्या कमी होतात आणि दृष्टी सुधारते. तसेच त्यात असलेले कॅरोटोनॉईड डोळ्यांसाठी उपयुक्त असते.

मक्याच्या कणसात असलेले अॅण्टीऑक्सीडेंट त्वचा उजळवण्यास मदत करते. मक्याच्या सेवनाने त्वचेचा तजेला वाढतो. अॅण्टीऑक्सीडेंटमुळे मुरुप, पुरळ यासारख्या समस्याही कमी होतात. कणीस खाण्याने शरीराची रोगप्रितकारशक्तीही वाढते. त्यामुळे सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कणीस खाणे फायदेशीर आहे. कणसामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हाडांच्या पोषणासाठी, वाढीसाठी आणि हाडांना मजबूती येण्यासाठी कणीस उपयोगी आहे. त्यामुळे पावसाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आरोग्याचे फायदे मिळवण्यासाठी कणीस खाणे फायद्याचे ठरते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post