उकडलेली अंडी खाण्याचे फायदे काय आहेत? दिवसाला किती अंडी खावी?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

ऑक्टोबरचा दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या अंडय़ांचे उत्पादन वाढत असून त्या तुलनेत अंडी खाण्याचे प्रमाण फारच कमी आहेत. प्रत्येक मानवाने वर्षभरात १८० अंडी खाणे आवश्यक असताना प्रत्येक भारतीय मात्र वर्षभरात केवळ सरासरी ३८ अंडी खातो. आहारात अंडय़ांचा वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात.

अंड्यातून नेमकं काय मिळते?

- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.
- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो
- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,
- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.

अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.

(कोरा या संकेतस्थळावर अरसालन शेख यांनी ही माहिती दिली आहे.)
Post a Comment

Previous Post Next Post