आवळा किंवा आवळा असलेले पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मोठ्या प्रमाणात विटामीन-सी युक्त आवळा प्रत्येक ऋतूमध्ये शरीरासाठी लाभदायक असतो. आवळा (Indian Gooseberry) कोलेस्ट्रॉल, रक्तातील चरबी (डिस्लिपिडिमिया) आणि सतत छातीत जळजळ याच्या उपायासाठी वापरला जातो. अतिसार, मळमळ आणि कर्करोगासाठी देखील याचा वापर केला जातो. परंतु या उपयोगांना समर्थन देण्यासाठी कोणतेही चांगले वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. 

हे काम कसे करते?
हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) नावाच्या "चांगल्या कोलेस्ट्रॉल" पातळीवर परिणाम न करता, ट्रायग्लिसेराइड्स नावाच्या फॅटी एसिडसह एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करुन काम करत असल्याचे दिसते. (Low Density Lipoprotein, Triglycerides आपल्या शरीरासाठी धोकादायक असतात)

केस, डोळे आणि त्वचा सोडून आवळ्याचे अनेक फायदे आहेत :
ज्या लोकांना डायबेटिस आहे (Type II) अशा लोकांसाठी आवळा हा अत्यंत फायदेशीर आहे. डायबेटीसच्या पेशंटला जर दररोज आवळ्याचा रस मधासोबत मिसळून दिला, तर त्यांना डायबेटीसच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

अॅसिडीटी झाल्यानंतर सुद्धा आवळा फार उपयोगी पडतो. आवळा पावडर साखरेसोबत मिसळून खाल्याने अथवा पाण्यात टाकून पिल्याने अॅसिडीटीपासून तुमची सुटका होते.

सतत छातीत जळजळ असलेल्या लोकांमधील संशोधनात असे दिसून आले आहे की, आवळ्याचा अर्क 4 आठवड्यांपर्यंत घेतल्यास छातीत जळजळ थांबते आणि त्याची तीव्रता कमी करण्यास मदत करते.

ऑस्टियो आर्थरायटिस (हाडं दुखीचा आजार) : 24 आठवड्यांसाठी दररोज तीन वेळा सेवन केल्यास ह्या रोगासाठी दिल्या जाणाऱ्या कॅप्सूल ग्लुकोसामाइन सल्फेट आणि सेलेकाॅक्सीब (celecoxib) पेेेक्षाही आवळा खाणे फायदेशीर असते.

डोळ्यांसाठी आवळा आमृतासारखे काम करतो. आवळा हा डोळ्याची पाहण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतो. आवळा खाल्ल्याने चष्मा जात नाही किंवा तुमचा नंबर कमी होत नाही. पण, तुमची दृष्टी चांगली टिकून राहते व तुम्हाला मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते. पण वयानुसार होणाऱ्या मोतीबिंदूला (Age Related Catract) रोखणे आपल्या हातात नाही.

रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास दररोज आवळ्याच्या रसाचे सेवन करणे लाभदायी ठरते. हे शरीरात लाल रक्त कोशिकांच्या निर्मितीत (Erythropoesis) मदत करते आणि शरीरात रक्ताची कमतरता भासू देत नाही.

तापापासून सुटका होण्यासाठी आवळ्याचा रस मदत करतो. आवळ्याचा रस निट ढवळून त्याचे सेवन केल्यास तापापासून आराम मिळतो.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यास आवळा फायदेशीर आहे. डाग काढून चेहरा उजळण्यास आणि तेजोमय बनवण्यास आवळा मोठी मदत करतो. आवळ्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग-चट्टे नाहीसे होतात.

कोरफडीच्या रससोबत आवळ्याचे सेवेन केल्यास पचनक्रिया आधिक चांगल्या प्रकारे काम करते.

३-४ चमचे आवळा आणि 3-४ चमचे कोरफडीचा रस मिक्स करून रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना त्याचे सेवन करावे. कोमट पाणी यामध्ये मिक्स केले कर उत्तमच.

(कोरा या संकेतस्थळावर मयुर सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही.)

Post a Comment

Previous Post Next Post