पोषक घटकांनी समृद्ध 'किवी'चे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

किवी पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले आहे. तसे तर या फळाचे मूळ स्थळ चीन आहे आणि जगभरात चीन हे किवीचे सर्वात मोठे उत्पादक आहे, परंतु आता जगभरातील सर्व लोक किवी चवीने खातात. याचे अनेक फायदे देखील आहे. या मध्ये अँटी बेक्टेरिअल आणि अँटी ऑक्सीडेन्टचे गुणधर्म आढळतात. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याचा उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि डोळ्यांचा अंधुक पणाच्या त्रासापासून वाचण्यासाठी करतात. याचे इतर फायदे देखील आहेत.

* असे म्हणतात की, पोटाच्या दुखण्यापासूनच सर्व रोगांची सुरुवात होते, म्हणून पोटाला स्वच्छ आणि निरोगी ठेवणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी आपण किवीचे सेवन करू शकता. यामध्ये फायबरसह पोट स्वच्छ करण्याचे गुणधर्म आढळतात. दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होतात.

* अनिद्राचा त्रास असल्यास देखील किवी फायदेशीर आहे. हे सेरोटोनिन आणि फोलेटने समृद्ध आहे. यामुळे अनिद्रा आणि न्यूरोसायकॅट्रिकच्या त्रासापासून मुक्त करतं. बऱ्याच अभ्यासामध्ये आढळले आहे की, जर झोपण्याच्या एक तासापूर्वी एक किंवा दोन किवी खाल्ल्या तर झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते.

* किवीचे सेवन देखील हृदयासाठी फायदेशीर आहे. अभ्यासानुसार किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन, खनिजे, अँटीऑक्सीडेंट आणि पॉलिफेनॉल हृदयविकारांचा धोका कमी करते. दररोजच्या सेवनाने हृदयरोगाच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.

* किवी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील प्रभावी आहे. वास्तविक यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जी आपली प्रतिकारक पेशींना बळकट करते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आपण रोग प्रतिकारक शक्ती बूस्टर फळ म्हणून दररोज याचे सेवन करू शकता.

(कोरा या संकेतस्थळावर संकेत यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post