एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
मुळ्याची पाने उग्र आणि राठ असल्यामुळे आणि ती खाल्ली की ढेकरही येतात. त्यामुळे बरेच लोक या हिरव्या भाजीच्या वाटेला जात नाहीत.
मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर अन्न घटकांचा समावेश असतो. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मुळ्याच्या पानांमधे फायबर असल्यामुळे पोट साफ राहते. त्यातील पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे लघवी साफ, मोकळी होते. लोह, जीवनसत्वे, खनिज व पानांच्या चोथ्यामुळे पचन चांगले होते. त्यामुळे ही पान पांढऱ्या मुळ्यासोबत बारीक चिरून तिखट, मीठ व वरून लिंबू पिळून जेवणासोबत खावी. ही भाजी खाल्ल्यावर सुस्ती वाटत नाही. उत्साही वाटते. मुळ्याची पाने इतर पालेभाज्यांप्रमाणे शरीरासाठी उपवुक्त आहेत.
अशी करा मुळ्याची भाजी..
एक मुळ्याची जुडी चांगली धुवून पानं देठांसकट बारीक चिरून घ्या. त्यात एक पांढरा मुळा बारीक चिरून घाला. चार हिरव्या मिरच्या तव्यावर भाजून, पाच सहा खोबऱ्याचे बारीक तुकडे, दोन छोटे चमचे शेंगदाणे, दोन छोटे चमचे तीळ घेवून सर्व वेगवेगळे तव्यावर भाजून घ्याचे. पाच सहा लसूण पाकळ्या, कोथींबीर घेवून जाडसर वाटावे किंवा ठेचून काढावे. कढईत कांदा व तेल टाकून कांदा थोडा झाला की जाडसर वाटलेल वाटण, हळद, मीठ परतून कापलेली मुळ्याची पान व कापलेला मुळा टाकून परतववे. खाली लागत असेल तर थोडा पाण्याचा शिपका मारावा. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
पान चिरून कांदा, लाल मिरचीचे तुकडे, तेल, मीठ टाकून तव्यावर शिजवूनही छान भाजी होते.
(कोरा या संकेतस्थळावर अलका सुरवडे यांनी ही माहिती दिली आहे.)
Post a Comment