खाण्यायोग्य डिंकाचा शरीराला काय फायदा होतो?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

डिंका मधे खुप पोस्टिक व औषधी गुणधर्म असतात. डिंक म्हणजे झाडाचा चिक किंवा पाणी असते. ते खोड़ातून बाहेर आले म्हणजे वाळून डिंक तयार होतो. एवढे मोठे झाड एकसंघ, मज़बूतीने बांधून ठेवण्याचे काम गोंद, डिंक करीत असतो. म्हणून बाळांतीणीला डिंकाचे लाडू देण्याची पद्धत आहे. त्यामुळे शरीरात शक्ति, मजबूती येते. शरीराची झीज व जखम भरून काढण्याचे काम डिंक करतो. हिवाळ्यात घरोघरी डिंकाचे लाडू बनवून खात असतात. त्यामुळे प्रतिकार शक्ति वाढते. बलदायी, मजबूत शरीरयष्टी बनते व स्नायुला बळकटी येते. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा डिंक असतो. प्रत्येक झाडाचे गुणधर्म त्या त्या झाड़ाच्या डिंकात आलेले असतात. उदा.खैर, धामोडी, साग, पळस, बोरी, बाभळी, कडूंनिंब या झाडांच्या डिंकामधे खुप औषधी गुणधर्म असतात.

कडाच्या झाड़ाचा डिंक पांढरा शुभ्र, मउ असतो. इतर डिंका प्रमाणे एकदम कड़क नसतो. दातानी सहज कुरूम कुरुम चावता येतो. विशेष म्हणजे दाताला चिकटुन राहत नाही. पूर्वी संडासाचे अंग जर बाहेर येत असेल तर कडाच्या झाड़ाचा डिंक खायला देत असत.

(कोरा या संकेतस्थळावर अलका सुरवडे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post