नाचणी खाण्याचे 'हे' आहेत फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

साधारणपणे प्रत्येक घरामध्ये ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार क्वचित वेळा केली जाते. खरं तर नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेष म्हणजे नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळ्या पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे चला तर आज जाणून घेऊयात नाचणी खाण्याचे फायदे.

१. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहते.

२. पोटदुखी, अपचन तक्रारी दूर होतात.

३. अशक्तपणा दूर होतो.

४. कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी.

५. शरीरावर फोड आल्यास ते फोडण्याकरिता नाचणीच्या पीठाचे पोटीस बांधावे.

६. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post