'ग्रीन टी' पिण्याचे 'हे' आहेत फायदे..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चहा किंवा कॉफीपेक्षा हल्ली बरेच जण ग्रीन टीकडे वळले आहेत. ग्रीन टीचे असंख्य फायदे कायम चर्चेत असतात. अनेक जण वजन कमी होईल म्हणून ग्रीन टीचा समावेश आहारात करतात. ग्रीन टी पिण्याचे नक्की कोणते फायदे आहेत हे आपण आज जाणून घेऊया.

  • ग्रीन टीमध्ये सध्या चहापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण असल्याने तो अधिक आरोग्यदायी असतो. त्याचबरोबर त्यात टॅनिन्स, कॅफेन, कॅटचिन्स, फ्लॅव्होनॉइड्स, फायटोचेमिकल्स असे अनेक आरोग्यदायी घटक असतात.
  • ग्रीन टी पिताना शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी ही मिळाल्यामुळे शरीरात उत्साह टिकून राहतो आणि पाण्याची कमतरता होत नाही, विशेषतः उन्हाळ्यात.
  • ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्यामुळे अनेक रोगांपासून संरक्षण मिळतं. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • ग्रीन टी बनवताना त्यात लिंबू, किसलेलं आलं, पुदिन्याची पानं, तुळशीची पाने घालून अधिक आरोग्यदायी करता येते.
  • नियमित ग्रीन टी प्यायल्याने मन शांत राहण्यास मदत होते. शरीरात उत्साह टिकून राहतो.
  • फक्त ग्रीन टीचा आहारात समावेश करून वजन कमी होत नाही, तर संपूर्ण आहारात सकारात्मक बदल आणल्यामुळे वजन कमी करण्यात यश येतं.
  • थंडीच्या दिवसांत गरमागरम आरोग्यदायी पेय म्हणून ग्रीन टीचा समावेश योग्य आहे.
  • वजन कमी करण्यासाठी जेवणऐवजी ग्रीन टीचा समावेश करणे योग्य नाही. त्यामुळे सकाळी किंवा मधल्या वेळेत ग्रीन टी पिणे योग्य आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post