बहुगुणी दुधी वनस्पती.. फायदे वाचून व्हाल थक्क!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

निसर्गाने मानवाला अनेक गोष्टींतून कितीतरी मोठा खजिना दिला आहे. त्यापैकी आयुर्वेद. यामध्ये अशा कितीतरी वनस्पती, औषधी आहेत की त्या आपल्या अवतीभवती सगळीकडे सहज उपलब्ध असतात. मात्र, आपल्याला त्या वनस्पतीची उपयुक्तता, अथवा गुणधर्म माहिती नसल्यामुळे आपण त्यांना अक्षरशः कचरा समजतो. अशीच ही दुधी नावाची वनस्पती आपण सर्वत्र बघत असतो; पण तिच्या बद्दल आपण अनभिज्ञ असल्याने ती किती चमत्कारीक गुणांनी परिपूर्ण आहे, हे माहीत नसते.

पावसाळ्यानंतर, ही वनस्पती रानात, उजाड माळरानावर, पायवाटेच्या बाजूंनी, पडीक जमिनीवर, जिथे जास्त गवताळ रान उगवते तिथे ही वनस्पती भरपूर प्रमाणात आढळते. माका या वनस्पतीशी साधर्म्य असणारी ही खुडली असता, यातून पांढरा दुधासारखा चिक येतो. पाने, चार ते पाच से.मी. असून, झुपकेदार छोटी फुले असतात. हिच्या खोडाला बारीक केसांसारखी लव असते.

उपयोग : मधूर, तीक्ष्ण, पचायला जड, पोटात घेतल्यास कृमी, जंत यांचा नाश करते. तोंडाची चव गेली असल्यास उपयुक्त, पोटात गेलेले विष बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. शुक्रजंतू (स्पर्म) वाढवणारी, बलवर्धक, उत्तम स्तंभक, धातूपुष्टी वर्धक, केश विकारात उत्तम, त्वचा रोगात उत्तम. या वनस्पतीच्या रसामध्ये थोडेसे दूध घालून याचा कल्प बनवून तो केसांच्या मुळाशी नियमित चोळल्याने केस गळणे थांबते. दुधीच्या मुळ्या चावून खाल्ल्यास दंतरोग, हिरड्यांचे रोग निश्चित बरे होतात. लहानपणापासून अडखळत, तोतरे बोलत असलेल्या मुलांसाठी अतिशय सुंदर गुण येतो. ही वनस्पती सावलीत वाळवून चूर्ण करावे. हे चूर्ण 2 ते 4 ग्रॅम इतके मधा सोबत चाटण करावे. अडखळत व तोतरे बोलणे हळूहळू बंद होऊन स्पष्ट उच्चार नक्की येतात. याचा (दुधीचा) नियमित काढा घेतल्यास श्वास, धाप, दमा हृदयरोग यावर रामबाण उपाय होतो. सतत लघवी येत असल्यास, दुधीचे चूर्ण एक ग्रॅम, पाच ग्रॅम गूळ, पाच ग्रॅम जिरे एकत्र करून घेतल्यास ही समस्या दूर होते. स्त्रियांच्या ‘मासिक धर्माच्या’ दिवसातील त्रासाकरिता सुद्धा हा उपाय करावा. ज्यांची कामशक्ती कमकुवत आहे, शिघ्रस्खलनची समस्या आहे, त्यांनी दुधीचे चूर्ण (एक ते दोन ग्रॅम) खडीसाखरे सोबत घ्यावे. ‘शक्ती’ वाढते.
- अशोक देसाई (साभार/स्त्रोत : पुढारी)

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post